abdul sattar
abdul sattar Saam Tv
महाराष्ट्र

Abdul Sattar यांच्या विरोधात ईडीत तक्रार दाखल

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या विरोधात सिल्लोडमधील (Sillod) आरटीआय कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली (Mahesh Shankarpelli) यांनी ईडीकडे (ED) तक्रार केली आहे. बेनामी संपत्ती जमावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. ईडीकडे पाठवलेल्या तक्रारीसोबत ७८४ पानांचे पुरावे दिल्याचा दावा शंकरपेल्ली यांनी केला आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आरटीआय (RTI) कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपल्ली यांनी ईडीकडे ही तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. (Abdul Sattar Latest Marathi News)

हे देखील पहा -

या तक्रारीत २२ वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यात शासकीय जमीन हडपणे, आमदार निधीमध्ये भ्रष्टाचार करणे, नोटबंदीत नोटा बदलून घेणे, कर्जमाफी घोटाळ्यासोबत वेगवेगळ्या २२ प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय. यातून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोट्यवधी रुपये गोळा करल्याचा गंभीर आरोप केला आहे. अब्दुल सत्तार यांची गुन्हेगारी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, शैक्षणिक संस्थेमधील घोटाळे, कोट्यावधीची अपसंपदा, बेनामी मालमत्ता, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, अवैध व्यवसाय याबाबत उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार कायदेशीर लेखी तक्रार करत असल्याचे महेश शंकरपेल्ली यांचे म्हणणे आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील वेगवेगळ्या तक्रारीबाबत ७८४ पानांचे पुरावे असून ते ईडी कार्यालयात सादर केल्याचा दावा शंकरपल्ली यांनी केला आहे. ईडीसोबतच तक्रारीची प्रत सिल्लोड पोलीस स्टेशन आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिल्याचे तक्रारीत लिहिले आहे.

तक्रार करणारा व्यक्ती हा भाजपशी संबंधित आहे. यापूर्वी त्याने अनेकदा माझ्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. आता ही तक्रारच मुळात दखल घेण्यासारखी नाही, तो व्यक्तीही दखल घेण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फोनवरून दिली आहे. सध्या त्यांना ताप, सर्दी असल्यानं दोन-तीन दिवस कोणाला भेटणार नाहीत. कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे टेस्ट केल्याशिवाय कोणाच्या संपर्कात येणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून उग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

SCROLL FOR NEXT