Parbhani Accident Saam TV
महाराष्ट्र

Parbhani: निलगाईची धडक, अपघातात महाविद्यालयीन युवक जागीच ठार

शेवडी, येनोली परिसरात रोही, हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा चारा पाण्याच्या शोधात नेहमीच वावर असतो.

राजेश काटकर

परभणी: निलगाय धडकल्याने झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जिंतूर शहरापासून पाच किलोमीटरवर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास जिंतूर- येलदरी राज्यमार्गावर झाला. शाम राजू राठोड (वय १८ वर्षे) असे मृताचे आणि ओमकार सुदाम जाधव (वय २१) असे जखमीचे नाव असून दोघेही तालुक्यातील येनोली तांडा येथील रहिवासी आहेत.

शेवडी, येनोली परिसरात रोही, हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा चारा पाण्याच्या शोधात नेहमीच वावर असतो. मंगळवारी सकाळी शाम व अशोक हे दोघे तरुण स्कुटी (नंबर एमएच २२,एएल १६३३) वरून जिंतूर शहराकडे येत असताना ज्ञानोपासक महाविद्यालया जवळच्या रस्त्यावर रोहींचा कळप रस्ता ओलांडत होता. त्यातील एक रोही त्यांच्या स्कुटीवर धडकून अपघात झाला.

अपघातात शाम राठोड याचा जागीच मृत्यू झाला. तर ओमकार जाधव हा डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. अपघाताच्या आवाजाने जमा झालेल्या जवळपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने आटो रिक्षात टाकून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमेवर प्रथमोपचार केले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणीला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस महामार्गाचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी रवाना झाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT