Solapur Accident विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार; जुना पुणे नाका येथील घटना

सोलापुरातील बाळे येथील राहत्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने (container) दिलेल्या धडकेत चाकाखाली सापडून, महाविद्यालयीन तरुणी जागीच ठार झाली

विश्वभुषण लिमये

सोलापूर: सोलापुरातील बाळे येथील राहत्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने (container) दिलेल्या धडकेत चाकाखाली सापडून, महाविद्यालयीन (College) तरुणी जागीच ठार झाली आहे. वैष्णवी सरवदे असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. ती संगमेश्वर महाविद्यालयात बी. एस्सीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

हे देखील पाहा-

कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या सर्व मैत्रिणींना (friends) उद्या पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन घरी निघाली होती. मात्र, तिची ही भेट शेवटची ठरली. या प्रकरणी चालक अजरोद्दीन शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वैष्णवी हिला आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. आई- वडिलांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. या प्रकारामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT