Weather Report Saam TV
महाराष्ट्र

Weather Report : राज्यात थंडीचा पारा आणखी वाढणार; तापमानात घसरण झाल्याने शाळांच्या वेळेत होणार बदल

मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून किमान तापमान ८ ते १२ अंशांपर्यंत पोहचले आहे.

Ruchika Jadhav

Weather Report : मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली आहे. वातावरणात गारठा पसरल्याने परत सगळीकडे शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. मुंबईत गेले काही दिवस तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकर सुखावले होते. मात्र आता पुन्हा एकदा थंडीने डोकं वर काढलं आहे. (Latest Weather Report News)

सोमवारी कुलाबा केंद्र येथील हवामान विभागाने किमान २२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्राने १९.४ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले आहे. पुढचे काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि कोकण वगळून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात जास्त प्रमाणात थंडी वाढणार आहे. मुंबई आणि कोकण पट्ट्यात थंडी जास्त प्रमाणात नसेल. मात्र वातावरणातील गारवा कायम राहण्याची शक्यता आहे, असेही अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. किमान तापमान ८ ते १२ अंशांपर्यंत पोहचले आहे. तर खानदेशात बऱ्याच ठिकाणी तपमानात ४ ते ६ अंशाने घसरण झाली आहे. १० ते १५ जानेवारी या काळात तापनात २ ते ३ अंशाने हळूहळू रोज घट होणार आहे. यामुळे पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव अशा सर्व लगतच्या जिल्ह्यांत कडाक्याची थंडी जाणवू शकते.

थंडीची लाट वाढल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. सर्व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली जात आहे. प्रशांत कनोजिया यांनी प्रशासनाला पत्राद्वारे ही विनंती केली होती. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिस्थिती तपासून आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. थंडीचा कडाका असल्याने लहान मुलांना सर्दी, खोकला अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशात मुलांच्या तब्येतीकडे पाहून शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT