Gyanesh Kumar Resignation Row: Cjp Issues 48-hour Ultimatum Over Sir saam tv
महाराष्ट्र

मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे गद्दार; राजीनामा द्या! ज्ञानेश कुमारांना कॉक्रोच जनता पार्टीचा 48 तासांचा अल्टीमेटम

CJP Demands Gyanesh Kumar’s Resignation : एसआयआरच्या मुद्द्यावरून कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यांनी ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

Bharat Jadhav

  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा ४८ तासांचा अल्टिमेटम

  • एसआयआरवरून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे आंदोलन

  • अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली

एसआयआरवरून निवडणूक आयोगात सुरू झालेल्या वादाने राजकारण तापलयं. विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा मागणी होतेय. आता वादात कॉक्रोच जनता पक्षाने उडी घेतलीय. केंद्र सरकारला बॅकफूटवर नेणाऱ्या सीजेपीनं आता मुख्य निवडणू आयुक्तांना ४८ तांसाचा अल्टीमेटम दिलाय.

कॉक्रोच जनता पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांच्या आत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिलाय. जर ज्ञानेश यांनी राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलनं केले जातील, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिलाय. एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तांचा हवाला देत अभिजीत दीपकेंनी "ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत. ते राष्ट्रद्रोही असल्याचं म्हटलंय.

एसआयआरच्या माध्यमातून देशातील 13 कोटींहून अधिक मते रद्द करण्यात आली आहेत. लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जातंय. लोकशाही म्हणजे लोकांनी सरकार निवडणे, पण ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून, कोण मतदान करेल आणि कोण नाही हे सरकार ठरवत असल्याच दीपके म्हणाले. ही लोकशाही आहे का? तुम्ही लोकशाहीची संपूर्ण व्याख्याच बदलली आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचंही दीपके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT