chandrapur Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur News : खासगी कोळसा खाण कंपनीची मनमानी, प्रकल्पग्रस्तांचा चंद्रपुरात मोर्चा

Coal Miners Morcha : शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त आज आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपुरात शेतकऱ्यांची आणखी एका कोळसा कंपनीकडून अडवणूक सुरू आहे. भद्रावती तालुक्यातील अरबिंदो खाजगी कोळसा खाण व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांशी संवाद न साधता खाणकाम सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तांनी आज (शुक्रवार) मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. (Maharashtra News)

चंद्रपूर तालुक्यातील किलोनीसह 6 गावे या खाणीमुळे बाधित होणार आहेत. कंपनीने नुकसानभरपाई, नोकरी याबाबत निश्चिती न केल्याने स्थानिकांनी आज मोर्चा काढला. अरबिंदो खाण कंपनीने स्थानिक नागरिकांमध्ये नुकसानभरपाईवरून फूट पाडल्याचे या मोर्चात (morcha) उघड झाले.

आंदोलक आणि काही ग्रामस्थ कंपनीला सहाय्य करण्याच्या मुद्यावरून आपसातच भिडले. दरम्यान या खाणीच्या मध्यभागी अस्तित्वात असलेल्या जुन्या डागा कोळसा खाणीतून अवैधरित्या पाणी बाहेर काढणे प्रारंभ केल्याने या क्षेत्रातील गावात नाल्यांना पूर आलाय. या अरबिंदोनिर्मित पुरामुळे शेतमाल काढणे अवघड झाले असून शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर वारंवार विचारणा करूनही कंपनीने मौन बाळगले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण डोंबिवलीतून ४० जण तडीपार; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT