CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

"गाढवाने लाथ मारण्याआधीच आम्ही..." उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरूवात झाली. 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवानों, भगिनीनों आणि मातांनो' अशी सुरुवात करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. "आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. (CM Uddhav Thackeray Speech Live)

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, "हल्ली खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मी मध्ये बोललो होतो की आमचं हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे. ते म्हणाले मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आपण पुढे जातोय. आपलं हिंदुत्व गदाधारी आहे, इतरांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा. काय मिळालं, घंटा" असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

"...तर त्यांचे तुकडे करू"

"आपण एक मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा भाजपाची सभा होती. तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठात आलं. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू" असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT