"काँग्रेससोबत असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही", मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं

CM Uddhav Thackeray Live : हिंदुत्वावर विरोधकांनी शिवसेनेला घेरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेचे बाण डागले
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई : "काँग्रेससोबत असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे". विरोधकांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर (Shivsena) टीका केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे. मुंबईतल्या बी.के.सी मैदानावर आज शिवसेनेची सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर (BJP Maharastra) तोफ डागली. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. (CM Uddhav Thackeray Live Speech)

CM Uddhav Thackeray
"गाढवाने लाथ मारण्याआधीच आम्ही..." उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवानों, भगिनीनों आणि मातांनो' अशी सुरुवात करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. हिंदुत्वावर विरोधकांनी शिवसेनेला घेरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेचे बाण डागले आहे. "आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड गेलो. तुमच्यासारखं सकाळचा शपथविधी नाही केला आम्ही. तुम्ही केलं तर पवित्र आणि आम्ही केलं तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली ते काय होतं. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून गुणगान केलं असतं असं वाटतं का तुम्हाला"? असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला आहे.

हिंदुत्वावरून भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "तुम्ही एनडीएत किती पक्ष जमवले होते? एनडीएक ३०-३५ लोक होते. नितीन गडकरींना विचारलं ही लोकं कोण? ते म्हणाले एनडीएतले सहकारी. काही-काहींचा एकही खासदार नव्हता. नितीश कुमारांना संघमुक्त भारत करायचा होता. त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसताय का? गेल्या आठवड्यात ते म्हणाले हे भोंगा वगैरे सगळं बकवास आहे. घातलं तुमच्या भोंग्यात त्यांनी पाणी. हिंमत आहे का तुमची नितीश कुमारांसमोर बोलायची. ते म्हणाले हे चाळे मी नाही करणार इकडे. ज्याची त्याची पूजा ज्यानं त्यानं करायची" असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com