Aurangabad Shivsena Poster Social Media
महाराष्ट्र

'ज्यादा द्याल ताण, तर उलटा घुसेल बाण'; औरंगाबादेत शिवसेना vs भाजप पोस्टर वॉर

शहरात शिवसेना विरुद्ध भाजप असा पोस्टर वॉर रंगला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी देखील झाली आहे. मात्र, त्याआधी शहरात शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा पोस्टर वॉर रंगला आहे. अशातच शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी आज पेपरमध्ये एक जाहिरात दिली आहे. ज्यामध्ये "ज्यादा द्याल ताण, तर उलटा घुसेल बाण", अशा स्वरुपाचा मजकूर लिहण्यात आला आहे. यावर भाजपने नाराजी दर्शवली असून याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. (CM Uddhav Thackeray Aurangabad Rally Latest News)

एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेआधी भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. शहरात ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी भाजपकडूनही पोस्टर लावून शिवसेनेला खिचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी आज पेपरमध्ये एक जाहिरात दिली. या जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना दिग्गज नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. इतकंच नाही तर, पोस्टरच्या वरच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो छापण्यात आला आहे.

Aurangabad Shivsena BJP Poster War

उद्धव ठाकरेजींवर प्रतिग्राम्यांचा का? असा सवाल देखील पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. इतकंच नाही तर, "ईडी आणि आर्थिक कोंडी करून उद्धवजी ठाकरेंना घेराल तर गाठ शिवशक्ती... भीमशक्तीशी आहे" असा इशाराही देण्यात आला आहे. पोस्टरच्या वरच्या बाजूला "ज्यादा द्याल ताण, तर उलटा घुसेल बाण, शेंडी जानव्याला हद्दपार करू" अशा स्वरुपाचा मजकूर छापण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या या पोस्टवर आता भाजपने आक्षेप घेतला आहे. हे पोस्टर आक्षेपार्ह असून याबाबत आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादेत शिवसेना विरुद्ध भाजप असा पोस्टर वॉर रंगला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT