CM Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Eknath Sinde on Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई; CM शिंदे म्हणातायत, पाणी साचलं ही तक्रार का करता?

Shivani Tichkule

Mumbai Rain News: राज्यात सर्वत्र मान्सून दाखल झाला आहे. काल पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसाने आणि नाले सफाई व्यवस्थित न झाल्याने मुंबईला पहिल्याच पावसात नदीचं स्वरुप प्राप्त झालं. हे पाहताच मुंबईकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पत्रकारांनी याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आलेल्या पावसाचं स्वागत करा, पाणी साचलं ही तक्रार का करता असं म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सोशल मीडियावर (Social Media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एका पत्रकाराने मुंबईत पहिल्या पावसानंतर पाणी तुंबल्याबद्दल प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, पाऊस (Rain) झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत.” असे अजब उत्तर दिले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि सगळे पावसाचं आनंदाने स्वागत करुयात. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाऊस कधी येणार याची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज अखेर मुंबईत (Mumbai) पाऊस चांगला झाला आहे. राज्यभर पेरण्या सुरु झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे असे देखील शिंदे यावेळी म्हणाले.

मुंबईत किती पाऊस झाला?

एकाच दिवसात १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल एकाच दिवसात एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (Mumbai) शहरात १०४ मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात गेल्या २४ तासांत अनुक्रमे १२३ मिमी आणि १३९ मिमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने याची माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT