CM Eknath Shinde, jayant patil, supreme court , maharashtra political crisis saam tv
महाराष्ट्र

Supreme Court Final Decision on Shivsena Case : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर जयंत पाटलांची भाजपवर आगपाखड

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Jayant Patil On Supreme Court Final Decision on Shivsena Case : राज्यातील सत्ता संघर्षाच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (ncp leader jayant patil) यांनी शिंदे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान राज्यपालांच्या अधिकाराचा गैर वापर झाल्याचेही पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra News)

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकाल वाचताना सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वाची निरीक्षणं (Supreme Court Final Decision on Shivsena Case) नोंदवली. ही निरीक्षणं उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असल्याचे दिसून आले. शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हिपचा निर्णय, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय आणि राज्यपाल भगत कोश्यारींची भूमिका यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटातील शिवसेनेचे नेत्यांसह राष्ट्रवादीचे नेते शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी करु लागले आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले शिंदे सरकार वाचलं हे थोडे दिवस त्यांना आनंद वाटेल पण भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती चुकीची आहे. ते म्हणाले राज्यपालांच्या अधिकाराचा गैर वापर झाला. न्यायालयाने नाेंदविलेल्या निरीक्षणानूसार शिंदे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी नैतिकता पाळून पायउतार व्हायला पाहिजे असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT