Cm Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: दोन समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही, याचं भान ठेवा; मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांना तंबी

CM Eknath Shinde News: निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल जोवर येत नाही तोपर्यंत कोणीही यावार वक्तव्य करू नये." अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत.

Ruchika Jadhav

Maratha Reservation:

राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. महायुतीमधील मंत्री छगन भुजबळांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास नकार दिलाय. तसेच काही मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यही समोर येत आहेत. या सर्वांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि मंत्र्यांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संवाद साधला. "निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल जोवर येत नाही तोपर्यंत कोणीही यावार वक्तव्य करू नये." अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत.

"महाराष्ट्राची एक पुरोगामी परंपरा आहे. त्यामुळे समाजात जाती आणि धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ न देण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. बैठकीनंतर महायुतीमध्ये समन्वय नसेल आणि मतभेद बाहेर येत असतील तर हे योग्य नाही. दिवाळीमध्ये राज्याचे वातावरण बिघडू नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीवेळी केलंय.

"मंत्र्यांनी शक्यतो वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. महायुतीमध्ये विसंवाद असल्याचं चित्र जनमानसात जाऊ नये यासाठी मंत्र्यांनी आपापसांतील समन्वय बिघडवू नका. यासह दोन समाजांत जातीय तेढ निर्माण होणार नाही, याचं भान सर्व मंत्र्यांनी ठेवावे आणि जबाबदारीने वक्तव्य करावे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील सात दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह 'या' राज्यात धुवाँधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधु एकत्र आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे - मंत्री जयकुमार गोरे

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार; 'या' दिवशी आयोगाविरोधात काढणार विराट मोर्चा|VIDEO

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

SCROLL FOR NEXT