Eknath Shinde, Pandharpur, Takli, CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या महाराष्ट्रातील पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यास तुफान गर्दी (व्हिडिओ पाहा)

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात आलेत.

भारत नागणे

टाकळी (पंढरपूर) : महाराष्ट्रात (maharashtra) सत्तांतर झाल्यानंतर आज (रविवार) आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पंढरपूरात (Pandharpur) विठ्ठलाची पूजा अर्चा करण्यासाठी आले आहेत. ही पूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा आज राज्यातील पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा टाकळीत संपन्न होत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (eknath shinde latest marathi news)

पंढरपूर पासून जवळ असलेल्या टाकळी येथे आयाेजिलेल्या या मेळाव्यासाठी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे अनेक आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचा महाराष्ट्रातील हा पहिला मेळावा असल्याने त्यांच्या गटाने देखील टाकळीत शक्तीप्रदर्शन केले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान करुन मेळाव्यास उपस्थिती लावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत होणार संतपरंपरेचा जागर; वरळीत ‘पादुका दर्शन महोत्सव’

Ashok Kharat Case: शंभरहुन अधिक महिलांचे लैंगिक शोषण; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी व्हिडिओ येणार समोर

Maharashtra Live News Update: सिन्नर तालुक्यात अशोक खरातची मोठी गुंतवणूक

भाजपच्या दिग्गज नेत्याला महिलेने चप्पलेनं चोपलं, राजकीय वर्तुळात खळबळ

Rain Alert : पुढचे ४ दिवस महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, या जिल्ह्यांना यलो अलर्ट; कुठे, कसं असेल हवामान, वाचा

SCROLL FOR NEXT