Shreya Maskar
सिंहगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरापासून नैऋत्येला सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाणे आहे.
सिंहगड किल्ला हा त्याच्या उत्तुंग आणि सरळसोट कड्यांसाठी, मराठ्यांच्या पराक्रमी लढायांच्या इतिहासासाठी आणि समुद्रसपाटीपासून १,३१२ मीटर उंचीसाठी प्रसिद्ध आहे.
सिंहगड किल्ल्याचा ट्रेक करताना सह्याद्री पर्वतरांगांच्या विहंगम दृश्य पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
सिंहगड किल्ल्याचा आकार पर्वतावरील सपाट पठाराच्या नैसर्गिक वळणांनुसार अनियमित, लांबट त्रिकोणासारखा किंवा उलथलेल्या पाचरसारखा (wedge) आहे.
सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव 'कोंढाणा' किल्ला असे आहे. जो मराठ्यांचे शौर्य आणि त्यांच्या धोरणात्मक लष्करी संरक्षणाचे प्रतीक म्हणून उभा आहे.
सिंहगड किल्ला हा १६७० मधील तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक लढाईसाठी प्रसिद्ध आहे. या लढाईत त्यांनी स्वतःचे प्राण पणाला लावून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा किल्ला जिंकून घेतला होता.
सिंहगड किल्ला २,००० वर्षांहून अधिक काळापूर्वी बांधला गेला होता; येथील प्राचीन कोरीव काम आणि गुहेतील रचना यांवरून असे दिसून येते की, या किल्ल्याची निर्मिती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील सातवाहन काळात झाली असावी.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.