Kolhapur Fort : शिवरायांनी ५०० दिवसांहून अधिक काळ वास्तव्य केलेला किल्ला, इतिहासप्रेमींनी नक्की पाहावा

Shreya Maskar

कोल्हापूर

पन्हाळा किल्ला कोल्हापूर शहरापासून वायव्येस सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळा या शहरात वसलेला आहे. हा इतिहासातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे.

Kolhapur | google

पन्हाळा किल्ला

पन्हाळा किल्ला हा दख्खन प्रदेशातील सर्वात मोठ्या डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे ५०० हून अधिक दिवस व्यतीत केले होते.

Panhala Fort | google

डोंगरी किल्ला

पन्हाळा किल्ला १२ व्या शतकातील एक भव्य गिरीदुर्ग आहे, ज्याने मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामरिक केंद्र आणि राजधानी म्हणून काम केले.

hill fort | google

ट्रेकिंग

पन्हाळा किल्ला पाहायला गेल्यावर पन्हाळा किल्ल्यापासून पावनखिंडीपर्यंतचा ५० किलोमीटरचा प्रवास नक्की करा. तुम्ही येथे कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत ट्रिप प्लान करू शकता.

Trekking | google

किल्ल्याची उंची

पन्हाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ८४५ मीटर (२,७७२ फूट) उंचीवर स्थित आहे. पन्हाळा किल्ल्यावरून कोल्हापूरचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Height of the fort | google

किल्ला कोणा बांधला?

पन्हाळा किल्ला मूळतः शिलाहार वंशाचा राजा 'राजा भोज दुसरा' याने इ.स. ११८ ते १२०९ या काळात बांधला होता.

Who built the fort? | google

कसं जाल?

मुंबई ते कोल्हापूर ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर कोल्हापूर स्टेशनला उतरून रिक्षा किंवा बसने तुम्ही पन्हाळा किल्ल्याजवळ पोहचाल. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.

Note | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

trekking | google

NEXT : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Maharashtra Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...