Eknath shinde and uddhav thackeray Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेना खरी की खोटी...

Maharashtra Politics : 'शिवसेना खरी आहे की खोटी याचं सर्टिफिकेट तुम्ही पाकिस्तानकडे मागता यापेक्षा दुर्दैव काय आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं.

Vishal Gangurde

विकास काटे

Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंची आज जळगावात जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंनी यांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'शिवसेना खरी आहे की खोटी याचं सर्टिफिकेट तुम्ही पाकिस्तानकडे मागता यापेक्षा दुर्दैव काय आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 'आता काही लोक तेच-तेच विचार आणि तेच टोमणे सारखे बोलत आहेत. फक्त मैदान बदलत आहेत. सारखे सारखे मर्द बनण्याचे पुरावे द्यावे लागतात, त्यांना काही संशय आहे का? असा सवाल करत टीकास्त्र सोडलं.

'आज कुठेतरी ते बोलले आहेत की शिवसेना खरी कोणती ते पाकिस्तानला विचारलं तर ते सांगतील. आता यांना काय बोलणार शिवसेनेची खरी की खोटी हे ओळखण्यासाठी तुम्हाला पाकिस्तानचा सर्टिफिकेट आता घ्यावा लागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

'या राज्यात तुम्ही काय केलेलं आहे, या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणाऱ्यांवर तुम्ही गुन्हा दाखल करता आणि या ठिकाणी या ज्यांनी बॉम्बस्फेट करून आणले त्याला पाठिंबा देतात. आज तुम्ही बोलतात की, शिवसेना खरी आहे की खोटी याचं सर्टिफिकेट तुम्ही पाकिस्तानकडे मागता यापेक्षा दुर्दैव काय आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं.

'हे सरकार कष्टकरी शेतकरी माता-भगिनी तसेच सर्वांचं आहे. या राज्यामध्ये माता भगिनींच्या सन्मानाला ठेच पोहोवण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. अशा प्रकारे राज्याचा कारभार या ठिकाणी सुरू आहे. या आधी आणि अनेक वेळा हिंदुत्व-हिंदुत्व बोलतात. परंतु बाळासाहेबांचा हिंदुत्व कुठे आणि तुमचा हिंदुत्व कुठे आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला.

'तुम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी एका मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा नाही केली? या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे मी एकच सांगत आहे, बाळासाहेबांच्या विचारांनी सरकार आम्ही याठिकाणी स्थापन केलेला आहे. या ठिकाणी केंद्राने आपल्याला भरभक्कम पाठिंबा दिलेला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउस शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Indian Currency: भारतीय नोटांच्या मागील बाजूस कोणकोणत्या भाषांचा वापर करण्यात आला आहे? वाचा सविस्तर

Pakistan Attack: पाकिस्तानी सैन्यांवर बलूच आर्मीकडून मोठा हल्ला, मेजरसह ४ जवानांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: सारथी विद्यार्थ्यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

India Tourism : थंड हवा, धबधबे, हिरवीगार वनराई; भारतातील 'या' हिल स्टेशनची बातच न्यारी

SCROLL FOR NEXT