Sanjay Raut - Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: CM शिंदेंचा संजय राऊतांना धक्का! संसदीय नेतेपदावरुन हटवले; 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Maharashtra Politics: याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. एकीकडे संजय राऊत (Sanjay Raut) शिंदे गटावर निशाणा साधत असतानाच शिंदे गटाचे आमदारही राऊतांवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळेच शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊत यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे.

राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. यांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहितीही दिली होती. त्यानुसार, आज ही निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: 'या' कारणांमुळे झोप पूर्ण झाल्यानंतरही जाणवतो थकवा

Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, ठाकरेसेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली

Saturday Horoscope : कार्तिकी एकादशीला धनाचा लाभ होईल; ५ राशींच्या लोकांचे सोन्याचे दिवस सुरु

Maharashtra Live News Update: ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व वकिलांचे १ दिवस कामकाज राहणार बंद

SSC-HSC Exam Date : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; वाचा कोणता पेपर कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT