Chhatrapati Sambhajinagar: लढाई नामांतराची! विरोधात ७० हजार अन् समर्थनार्थ १००० अर्ज दाखल; शेवटचे ३ दिवस शिल्लक

Chhatrapati Sambhajinagar Name Change: नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात दाखल होणाऱ्या अर्जातून आपली भूमिका भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Aurangabad Now become Sambhajinagar
Aurangabad Now become SambhajinagarSaamtv

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. तेव्हापासून या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला एमआयएमने विरोध दर्शवला जात होता. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर नामांतरनंतर आक्षेप आणि हरकती घेण्यासाठी 27 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.

त्यामुळेच विभागीय आयुक्त कार्यालयामधल्या आवक जावक शाखेमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतर विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांची आहे.

Aurangabad Now become Sambhajinagar
Eknath Shinde: दौरा ठरला! 'या' तारखेला CM शिंदे ४० आमदारांसह अयोध्येला जाणार; प्रभू रामचंद्रांचं दर्शन अन् शरयूकाठी पूजा करणार

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असताना समर्थनात आणि विरोधात हजारो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळत आहे. आजपर्यंत जवळपास 70 हजार अर्ज हे नामांतर विरोधात तर समर्थनार्थ केवळ हजारभर अर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.

Aurangabad Now become Sambhajinagar
Crime News: दूध आणायला गेला तो परतलाच नाही; शेतात आढळला मृतदेह

एकाच दिवसात 24 हजार आक्षेपाचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाले आहेत. तर नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात दाखल होणाऱ्या अर्जातून आपली भूमिका भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच दोन्ही बाजूने अधिकाधिक अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात मोहीम राबवत कॅम्प देखील लावण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com