eknath shinde news  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: 'पत्रकारांवर कोणत्याही परिस्थितीत...'; पत्रकार मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Journalist Sandeep Mahajan beaten up in case: पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या पत्रकार मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे.

Vishal Gangurde

Eknath Shinde News: शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची काही दिवसापूर्वी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपमध्ये आमदाराने पत्रकाराला मारहाणीची धमकी दिली होती. याचदरम्यान, आज जळगावमध्ये याच पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या पत्रकार मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. (Latest Marathi News)

'सकाळ'च्या वृत्तानुसार, आज जळगावमध्ये पत्रकार संदीप महाजन हे घरी दुचाकीवरून जात असताना काही अज्ञातांनी हल्ला केला. महाजन यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणावर राज्यातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पत्रकारावर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये. दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी पत्रकार हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, 'पत्रकाराला फोनवर आई- बहिणीवरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून…'.

'विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल, असे रोहित पवार पुढे म्हणाले.

'आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो,सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे,परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे, असे रोहित पवार पुढे म्हणाले .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT