Cm Eknath Shinde 
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: पुढच्या अडीच वर्षात एकही खड्डा पडणार नाही: CM शिंदे

Cm Eknath Shinde Pre-Monsoon Meeting: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, एनडीआरफच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्सून पूर्व कामांचा आढावा घेतला.

Bharat Jadhav

सुरज मसूरकर, साम प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आज मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला असून मुख्यमंत्र्यांनी परत एकदा खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्धार व्यक्त केला.पुढील दोन अडीच वर्षात एकही खड्डा सापडणार नाही.पुढील २५-३० वर्ष मुंबईकरांना खड्यांचा सामना करावा लागणार नसल्याचं दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

या बैठकीत महापालिका, नेव्ही, एअरफोर्स,एनडीआरएफचे अधिकार उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यापूर्वी जेजे काही काळजी घेतली पाहिजे त्यावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी आणि लोकांच्या मातमत्तेची हानी होऊ नये. यासाठी एक टीम म्हणून काम केलं पाहिजे असं शिंदे म्हणालेत.

पावसाळ्यात मुंबईत जागोजागी पाणी तुंबत असते, त्यासाठीदेखील उपाय योजना करण्यात आल्याचं सांगत मुख्यमंत्री म्हणालेत.नालेसफाई पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्यात.तसेच जिकडे पाणी भरत असते तिकडे हाय व्होलटेज पंप २४ तास ठेवणार चालू ठेवले जाणार आहेत. रस्त्यावरचे खड्डे पूर्ण पणे, पाणी साचू नये या सर्व सुचना दिल्यात.जिकडे काम सुरू आहेत तिकडे लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.रेल्वेच्या हद्दतील नाले आहेत, त्यांना देखील पावसाळीपूर्वी साफ केले गेले पाहिजे,अशा सुचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

रेल्वे बंद पडल्यास इतर सुविधा देण्यात येणार आहे. दरड कोसळणे यावरदेखील उपाय योजना केल्या जात आहेत. ते कसे प्रोटेक्ट करता येईल.तसेच तिकडे सेफ्टी नेट ने ते सुरक्षित करू शकतो का? यावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. नालेसफाई अजून १००% झालेली नाही.त्या पूर्ण केल्या जावेत.नाल्यातील हार्डबेस लागेपर्यंत गाळ काढण्यात यावेत, अशा सूचना दिल्याचं शिंदे म्हणालेत.सर्व वार्ड अधिकाऱ्यांनी आपापल्या वॉर्डमध्ये पूर्ण नालेसफाई होईल याची काळजी घ्यावी, असे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alia Bhatt and Katrina Kaif: आलिया भट्ट की कतरिना कैफ कोण आहे जास्त श्रीमंत?

Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंच्या मागण्या काय होत्या? सरकारकडून नेमका काय निर्णय झाला? वाचा सविस्तर

Manoj jarange patil protest live updates: मागण्या मान्य, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

Fraud Marriage : विवाह लावून देत फसवणूक; लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पर्दाफाश

Vanita Kharat: सौंदर्याची खाण! वनिताचे फोटो पाहून हेच म्हणाल

SCROLL FOR NEXT