CM Eknath Shinde Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: घटनाबाह्य सरकार बोलणाऱ्यांना आज मेरिटवर उत्तर मिळेल; CM शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

MLA Disqualification Result: आमचं बहुमताचं सरकार आहे. घटनाबाह्य सरकार बोलणाऱ्यांना आज मेरिटवर उत्तर मिळेल असं आम्हाला अपेक्षित आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे.

Ruchika Jadhav

Eknath Shinde:

आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल जाहीर होणार आहे. निकाल वाचनाला अवघे काही तास शिल्लक असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, अशा शब्दांत शिंदेनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलंय.

घटनाबाह्य सरकार बोलणाऱ्यांना आज मेरिटवर उत्तर मिळेल

आमचं बहुमताचं सरकार आहे. घटनाबाह्य सरकार बोलणाऱ्यांना आज मेरिटवर उत्तर मिळेल असं आम्हाला अपेक्षित आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यापासून आज पडणार, उद्या पडणार अशी भाकीतं करण्यात आलीत. त्यांना त्यांचा पराभव आता दिसू लागला आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांचा उल्लेख करत म्हटलं की, दीड वर्षांत आम्ही जे काम केलं त्यावरून ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि महायुती नंबर एकला आली. याचा त्यांनी विचार केला पाहिजे. तसेच स्वत:चं आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असा सल्ला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

काल माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदरांचा आरोपी म्हणून उल्लेख केला होता. यावारून देखील एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केलीये. मुख्यमंत्री पदावर काम केलेल्या व्यक्ती असा शब्द वापरू शकतात. हेच तर दुर्दैव आहे. त्यांचे १४ आमदार आहेत. त्यामुळे आम्ही सुद्धा म्हणायचं का? की ते आरोपी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलाय. त्यामुळे निर्णय बहुमताच्या बाजूनेच लागेल, असं एकनाथ शिंदेंनी ठामपणे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT