Mahayuti  Saam TV
महाराष्ट्र

CM Shinde on Maratha Andolan : जालन्यात चुकीच्या पद्धतीने ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घेतल्या जातील : मुख्यमंत्री

Political News : जालन्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मी स्वत: मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचित केली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्यात मराठा आरक्षणावरून सुरु झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, जालन्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मी स्वत: मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचित केली आहे.

मराठा समाजाची आंदोलने आपण सर्वांना पाहिली आहेत. लाखोंचे ५८ मोर्चे शांततेत राज्यात निघाले. मात्र दोन-तीन दिवसांपासून जे काही घडतंय त्याबद्दल मी बोललो आहे. आंदोलनाच्या आडून महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचं काम सुरु आहे, याबाबत मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, अतूल सावे मंत्री, खासदार उदयनराजे भोसले देखील बैठकीला उपस्थित होते.

सरकार प्रमाणिकपणे आरक्षण देण्याच्या बाजूने

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र ते टिकलं पाहिजे. आम्हाला कोणाला फसवायचं नाही. आमची भुमिका देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही होती आणि आजही आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या मुद्द्यावर काम आता सुरु आहे. आयोगाला सूचना केल्या आहेत. ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढल्या आहेत त्यावर काम सुरु आहे. मराठा समाजाला माझी विनंती आहे, सरकार पूर्णपणे प्रमाणिकपणे आरक्षण देण्याच्या बाजूने आहे.

दोषींवर कारवाई केली जाईल

पोलीस महासंचालकाच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. जालना पोलीस अधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली केली आहे. उपविभागीय अधिकारी निलंबित केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मनोज जरांगेंशी आजची चर्चा करणार

गिरीश महाजन आणि आमचे मंत्री मनोज जरांगेंची आज भेट घेतील. चर्चेतून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.

कुणबी समाजाचा दाखला देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. मराठा कुणबी दाखले मिळायला अडचणी येत आहेत. १ महिन्यात अहवाल सादर होईल.

तसेच त्याठिकाणी चुकीच्या पद्धतीने ज्या केसेस दाखल केल्या आहेत त्या मागे घेतल्या जातील, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

Mumbai :...तर आम्हीही रस्त्यावर उतरू; मुंबईतील कबूतरखान्यांचा वाद पुन्हा तापणार; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT