Shruti Vilas Kadam
रवा (सूजी), दही, पाणी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि तेल घ्या.
एका भांड्यात रवा आणि दही एकत्र करून थोडे पाणी घालून मध्यम घट्ट बॅटर तयार करा. १०–१५ मिनिटे झाकून ठेवा.
बॅटरमध्ये मीठ, जिरे, हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा.
नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करून थोडे तेल लावा.
तव्यावर एक पळी बॅटर ओतून गोलाकार पसरवा आणि कडा थोड्या तेलाने शिजू द्या.
चीला खालची बाजू सोनेरी झाल्यावर उलटून दुसरी बाजूही कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
गरमागरम रवा चीला हिरव्या चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.