Maharashtra All Party Meeting: Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra All Party Meeting: मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यावर एकमत; OBCतून आरक्षण देण्यासंदर्भात विचार नाही!

Maharashtra All Party Meeting : या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले. मात्र, ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात विचार नसल्याची स्पष्टोक्ती सरकारकडून देण्यात आली आहे.

सूरज सावंत

Maharashtra All Party Meeting on Maratha Aarakshan:

जालन्यातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले. मात्र, ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात विचार नसल्याची स्पष्टोक्ती सरकारकडून देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बहुतांश राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. सह्याद्री अतिथीगृहावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले. ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात सरकारचा विचार नसणार आहे.

या बैठकीत सुरुवातीलाच भाजपसह अन्य पक्षातील ओबीसी नेत्यांनी सरकारची बाजू स्पष्ट करायला लावली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आघाडी सरकारने वापरलेल्या फॉर्म्युल्यावरच सरकार काम करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत अन्य कोणत्याही समाजातील आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

बैठकीत वंचित आणि आरपीआयचा(खरात गट) वेगळा सूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत वंचित आणि आरपीआय खरात गटाचा वेगळा सूर पाहायला मिळाला. या बैठकीत वंचितने सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यापेक्षा गरीब मराठ्यांना जातीनिहाय आरक्षण देण्याची मागणी केली.

तर मराठा-ओबीसी आणि एसटी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण देण्याची मागणी आरपीआयच्या खराट गटाने केली. तसेच कोणाचेही आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यास दोघांनी विरोध दर्शवला.

बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराजी

तत्पूर्वी, सर्वपक्षीय बैठकीत समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील सकारात्मक नाही, त्यामुळे तात्काळ त्यांना बदलावे अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी बैठकीत केली .

ठाकरे गटाच्या आमदारांनी चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली. तर चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष असतानाही ते बैठकीला का उपस्थित नाही, असा ठाकरे गटाकडून सवाल उपस्थित करण्यात आला.

मनसेची भूमिका गुलदस्त्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मनसेकडून कोणतीही जाहीर भूमिका मांडण्यात आली नाही. या बैठकीला मनसेचे एकमेवर आमदार राजू पाटील उपस्थित होते. मात्र आरक्षणासंदर्भात कोणतीही भूमिका न मांडल्याने सर्वपक्षीय नेते आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज ठाकरेंनी मागच्या आठवड्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT