Eknath shinde News
Eknath shinde News  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News : डबल इंजिन सरकारला महापालिकांचे एक-एक डबे जोडले जातील, CM शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Satish Daud-Patil

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Eknath Shinde News : राज्यात स्थापन झालेलं सरकार हे डबल इंजिनच सरकार आहे. डबल इंजिन वेगाने धावतंय म्हणूनच आपल्याला विकास दिसतोय. यापुढेही विकास दिसेल आणि या डबल इंजिनला मुंबईसह सर्व महापालिकेचे एक एक डबे जोडले जातील आणि आपली एक्सप्रेस तुफान गतीने धावू लागेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. ते कल्याणमध्ये बोलत होते.  (Maharashtra Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कल्याण पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुलात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना घरकुलांच्या चाव्या देखील वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर अमृत अभियानअंतर्गत वाघेघर व आंबिवली येथील मलशुध्दीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

प्रबोधनकार ठाकरे तलावाचे लोकार्पण सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड ,आयुक्त भाऊसाहेब दांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवली शहराचा विकास सांगताना शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून धरणाची गरज असल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. (Latest Marathi News)

'बाळासाहेबांच्या मनातलं सरकार स्थापन केलं'

मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच कल्याणमध्ये आपल्या दर्शनाला आलोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले. जेव्हा आपल्या जिल्ह्यात येतो तेव्हा आपल्या कार्यक्रमाची महती वेगळी असते. याच मैदानावर बाळासाहेबांची शेवटची सभा झाली होती. आम्ही बाळासाहेबांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. गेले बारा वर्ष हा आपला बी एसयुपी प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लागला शेवटी सरकार जे लोकांच्या भल्याचा निर्णय घेणारे सरकार असल्याशिवाय त्याचबरोबर इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नाही. त्याला काळ वेळ योग लागतो आणि तो योग जुळून आला, असंही शिंदे म्हणाले.

गेल्या सहा सात महिन्यांमध्ये आपल्या सरकारने घेतलेले निर्णय मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. हे सरकार लोकाभिमुख, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. मुख्यमंत्री पण तुमचा आहे. आम्ही घेतलेले भूमिका तुमच्या मनातली भूमिका आहे. जसा केंद्राचा अर्थसंकल्प झाला तसाच राज्याचा देखील अर्थसंकल्प चांगलाच होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरण, भाजपच्या उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी बंदी

Australia Squad: T-20 WC आधी ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल! १५ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान

FD Investment Tips: एक नंबर! तुमच्या गुंतवणुकीवर 'या ५ बँका देतील ९.६० टक्के व्याज

Satara Peacock Viral : माणसाळलेला मोर बघा! बिनधास्त पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतोय, मोबाइल कॅमेऱ्यासमोरही देतो पोझ, Video

Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर

SCROLL FOR NEXT