Gadchiroli Flood News, Eknath Shinde News, Monsoon Update 2022 saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Flood : गडचिरोलीमध्ये पूराचं थैमान; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये गडचिरोलीच्या पूर परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे

संजय डाफ

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान, गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नागपूरमध्ये गडचिरोलीच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,'गडचिरोलीमध्ये पूरग्रस्त परिस्थिती असल्याने पाहणी करणार आहोत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून यंत्रणा सतर्क आहे. जीवितहानी होणार नाही, यासाठी यंत्रणा सतर्क आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही. नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्यातील इतर भागातही विशेष सूचना दिल्या आहेत. राज्य आपत्कालीन विभाग, सैनिक, एनडीआरएफ या सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यांना सतर्क केलं आहे. कुठलीही यंत्रणा कमी पडणार नाही'.

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy rainfall) धडाका घातला आहे. पावसाची संततधार सुरुच असल्याने नद्या-नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अंदाजानुासार (imd alert) संपूर्ण गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील आणखी दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. (Gadchiroli Flood News)

जिल्हाधिकारी संजय मीना यांनी काल पावसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) सर्व नागरिकांना सूचनांचे पालन करुन खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलं. दरम्यान, जिल्ह्यात पुढील दोन दिवस शासकीय, निमशासकीय व आत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Misal Pav Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा झणझणीत मिसळ, रेसिपी वाचा

2025 Horoscope: नव्या वर्षात शुक्रामुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंच्या सूचनेवरुन मनोज जरांगेशी संवाद, त्यानंतर माघार; असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट

Winter Season: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT