Eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde |'अनेकांना वाटतंय सरकार कोसळणार, पण...';मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेना नेत्यांकडून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

विलास काटे

Eknath Shinde News : शिंदे सरकार राज्याच्या सत्तेवर विराजमान होताच राज्यातील राजकीय समीकरण संपूर्ण बदललं आहे. राज्यात शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेना नेत्यांकडून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शुक्रवारी आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या समाधी स्थळी भेट दिली. तसेच त्यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. या वेळी आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या आठवणी जागवल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'ठाण्याचा मुख्यमंत्री होईल असं आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं. इच्छा होती. मी मुख्यमंत्री झाल्यावर अरुणाताईंनी दिघे साहेबांची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनंदन केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचं स्वप्न आणि इच्छा तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा कामी आल्या. त्यामुळे आपण ही लढाई जिंकलो. आज मला समाधान वाटतंय'.

'गुरुवर्यांच्या आशीर्वादामुळे हा पल्ला मला गाठता आला. आंनद दिघे यांचे गौरव कार्य जगभरला पोहोचलं. सत्तेवर आल्यावर सर्वांसाठी मोठे निर्णय घेतले. पोलिसांसाठी महत्वाचे निर्णय घेतले. आमच्या सरकारचे निर्णय सामान्य घटकांना न्याय देणारे निर्णय आहेत. कोणाला वाटत नव्हतं. आजही अनेकांना वाटतं की, हे सरकार राहणार नाही, कोसळेल. पण त्याची आम्हाला फिकीर नाही. सरकार हे सर्वसामान्य लोकांचं आहे. आम्हाला सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं आहे. जास्तीत जास्त काम सरकारच्या माध्यमातून करत आहोत. याचं सर्वांना आश्चर्य वाटत आहे. हे कोणाला पचतही नाही. काही जणांच्या घशाखाली उतरत नाही. पण सत्य हे सत्य आहे', असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT