cm eknath shinde criticize uddhav thackeray in shasan aplya dari in islampur Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : हे चोरले ते चोरले म्हणून काही लोकांचे सारखे रडगाणे सुरु आहे, घरी बसून काम हाेत नाही : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर राेख

CM Eknath Shinde Latest Marathi News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाेलत हाेते.

Siddharth Latkar

Sangli :

घरी बसून काम होत नाही. फेस टू फेस काम केलं पाहिजे, कोरोनामध्ये ठीक होते, फेसबुक लाईव्हवर सगळे सुरू होते. पण लोकात मिसळून कामे केली पाहिजेत असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज पुन्हा लगावला. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. (Maharashtra News)

शिंदे म्हणाले लोकाभिमुख सरकार म्हणून महाराष्ट्रला पहिला नंबर भेटेल. हे सरकार आल्यावर पहिला निर्णय आमच्या सरकारने पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. आणि 500 पेक्षा जास्त निर्णय आतापर्यंत सरकारने घेतले आहेत. तसेच 15 लाख हेक्टर जमीन सिचनाखाली आणण्याचे काम या सरकारने केले आहे.

महिला सक्षमीकरणचे धोरण आमचे सरकार चांगल्या पद्धतीने राबवत आहे. महिलांनी आता बचत गट वाढवावेत. या बचत गटाच्या मालाचे ब्रँडिंग करा, त्यांना जागा मिळवून द्या. कारण माता सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित ही योजना आमच्या सरकारने आणली आहे.

विरोधकांची पायाखालची वाळू आता सरकली आहे. तसेच हे चोरले ते चोरले म्हणून काही लोकांचे सारखे रडगाणे सुरु आहे. पण आम्ही मात्र विरोधकांना कामातून उत्तर देत आहाेत. आम्ही बाळासाहेब याचे विचार घेऊन पुढे चाललो आहाेत. जे काही निर्णय घेतले ते गोरगरीब यांच्यासाठी घेतले आहेत.

शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? का सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनी झाले पाहिजे. सीएम म्हणजे माझ्यासाठी कॉमन मॅन. हीच काही लोकांसाठी पोटदुखी ठरत आहे. त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तयार केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्र मधील डबल इंजिन सरकारचा जनतेला फायदा व्हावा म्हणून आम्ही मरमर मरतोय. विराेधक 10 वर्षात मोदी यांच्यावर भ्रष्ट्राचारचा एकही आरोप करू शकले नाहीत. तर महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवले तर कसे उद्योग येतील असाही टोलाही विरोधकांना एकनाथ शिंदेंनी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Free: केंद्रानंतर राज्य सरकारनं दिली खुशखबर; आता 100 टक्के टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Ulhasnagar News : धक्कादायक! उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुलींचं पलायन

Maharashtra Politics: फडणवीस सरकार अस्थिर करण्यामागे शिंदे? जरांगेंशी वाटाघाटीतून शिंदे दूर?

Karjat Muslim Township: मुंबईजवळ मुस्लिम टाऊनशिप वादात; मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

Hill Station: शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग, स्वर्गाहूनी सुंदर 'हे' हिल स्टेशन पाहून मनाला पडेल भुरळ

SCROLL FOR NEXT