MLA Lata Sonawane Car Accident Saam tv
महाराष्ट्र

MLA Lata Sonawane Car Accident: शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणेंच्या कारला भरधाव डंपरने दिली धडक; अपघातातून थोडक्यात बचावल्या

शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. सोनवणे यांच्या कारला भरधाव डंपरने धडक दिली.

Vishal Gangurde

Jalgaon News: शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. सोनवणे यांच्या कारला भरधाव डंपरने धडक दिली. या अपघातात आमदार सोनवणे थोडक्यात बचावल्या आहेत. सोनवणे यांच्या कारला अपघात शनिवारी झाला. सोनवणे यांचा चोपड्यातून जळगावला येताना हा अपघात झाला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडावरून जळगावला येताना आमदार लता सोनवणे यांची कार डंपरला धडकली. या अपघातात लता सोनवणे थोडक्यात बचावल्या. लता सोनवणे यांच्या दोन्ही हातांना मार लागला आहे . अपघातानंतर सोनवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघाताची माहिती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे. चंद्रकांत सोनवणे पुढे म्हणाले, 'या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने आम्ही या अपघातातून सुखरूप बचावलो आहोत.

बुलढाण्यात ट्रॅक्टर उलटून चालक ठार!

बुलढाण्यात (Buldhana) देखील भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा - जयरामगड रोडवर ही घटना घडली आहे.

नेमका अपघात कसा झाला?

संतोष श्रीकृष्ण गवई वय (३२ वर्षे रा. कंचनपुर ता.खामगाव) हा नांगरटी करण्यासाठी कंचनपूरहून लाखनवाडा येथे गेला होता. नांगरटी करून तो पुन्हा कंचनपूर येथे परत येत होता. त्यावेळी त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याले ट्रॅक्टर पलटी झाला आहे. त्याच ट्रॅक्टर खाली येऊन संतोष श्रीकृष्ण गवई याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT