Eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: "बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तर...." बंडखोरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Eknath Shinde Big Statement | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाजवळील तापोळा येथे बोलत होते.

संभाजी थोरात

सातारा: "बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता," असं खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा (Satara) जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाजवळील तापोळा येथे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे आल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी पद्मावती मंदिरात ते ग्रामस्थांसमोर बोलत होते. यावेळी हे वक्तव्य केले. लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत झालं असंही ते म्हणाले. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील तापोळा- दरे परिसरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत झालं असंही ते म्हणाले."

पुढे ते म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न विचारला जात होता. ते झाले, आता खाते वाटपही होईल. आज मी माझ्या जन्मभूमीकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येतोय. इथल्या लोकांनी माझं मनापासून स्वागत केलं. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यापूर्वीही कायम होत्या. आज त्यांच्या डोळ्यात आंनद दिसत होता. स्वागत-सत्कार खूप होतात, मात्र काही विशिष्ट सत्कार खास असतात. मी आपल्या लोकांमध्ये आलोय. हे सरकार सेना-भाजपा युतीचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, त्यामुळे सामान्य माणसाचं काम होणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसेच ते म्हणाले की, कोयनेच्या पुनर्वसनाचे काम होईल, त्यातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. आमचं डबल इंजिन सरकार आहे, मोदींचा पाठिंबा आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांचं लोकांनी भरभरुन स्वागत केलं. भर पावसात खेड्या-पाड्यातून लोक तापोळ्यात आले होते. फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं गेलं. रक्षाबंधनमुळे महिलांनी त्यांना राख्या बांधल्या. यावेळी तापोळा येथील पद्मावती देवीचं दर्शन त्यानी घेतलं. तब्बल 39 दिवसांनंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला. 9 ऑगस्टला शिंदे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT