Eknath Shinde  Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगांची झाडाझडती

Eknath Shinde bags checked in nashik : नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या २ बॅगांची तपासणी करण्यात आली.

Vishal Gangurde

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये उतरले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या २ बॅगांची तपासणी केली. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिंदेंनी बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँडिग होताच निवडणूक अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी त्यांच्या बॅगामध्ये काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही.

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी ही झाली आहे. 'आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो आहोत', असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

संजय राऊतांनी काय आरोप केले होते?

संजय राऊत यांनी सोमवारी आरोप करताना म्हटलं होतं की, 'मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरमधून १२-१२ बॅगा आणल्या होत्या. नाशिकमध्ये दोन तासांसाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरताना दिसत होते. ५०० सूट की ५०० सफारी आणल्या होत्या? त्या बॅगा कसल्या आहेत. त्या कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या. त्यानंतर कोणाल्या वाटल्या? तो व्हिडिओ सुद्धा देत आहोत'.

राऊतांनी आज काय आरोप केले?

'घटनाबाह्य सरकारच्या घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशाला पाहिजे. पैसे फेको और तमाशा देखो, हा त्यांचा जाहीरनामा आहे. हेलिकॉप्टरमधून खोके उतरावयचे. पोलिसांच्या वाहनातून पैसे वाटायचे. लाखो मत विकत घेण्याच्या योजना आखायच्या. रेटून खोटं बोलायचं. याच्यापेक्षा त्यांचा वेगळा राजीनामा नाही, असे राऊत आज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT