Cm Eknath Shinde and Radhakrishna Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: मुख्यमंत्री शिंदेंचं फू बाई फू, पंढरपुरात विखेंसोबत घेतला फुगडी खेळण्याचा आनंद

मुख्यमंत्री शिंदेंचं फू बाई फू, पंढरपुरात विखेंसोबत घेतला फुगडी खेळण्याचा आनंद

Satish Kengar

Ashadhi Ekadashi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या क्षणाचा आनंद घेत मुख्यमंत्री शिंदे हातात टाळ घेऊन विठुरायाच्या गजरात तल्लीन झाल्याचे दिसले.

तसेच यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुगडीचा आनंदही लुटला. मुख्यमंत्री यांच्यासोबत शिवसेना नेते भरत गोगावले आणि आमदार शहाजीबापू पाटील हे देखील पंढरपुरात उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर शहरात पाऊल टाकताच सगळ्यात आधी शहरात करण्यात आलेल्या स्वच्छतेचा आढावा घेतला. शहरात आल्यावर रस्त्याने चालणाऱ्या वारकऱ्यांना भेटल्यानंतर त्याना रस्त्यात त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील शौचालये दिसली.

तत्काळ त्यांनी गाडीतून उतरत या स्वच्छतागृहाना भेटी देऊन ती खरोखरच स्वच्छ आहेत, अथवा नाही याची पाहणी केली. यावेळी ही स्वच्छतागृह खरोखरच स्वच्छ असून त्यात पुरेसे पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहून त्यांनी केलेल्या सुचना जिल्हा प्रशासनाने आचरणात आणलेल्या आहेत याची खात्री करूनच ते पुढे शासकीय विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाले.  (Latest Marathi News)

दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाले आहे. गतवर्षी राज्यात अचानक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना विठुरायाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बिहारमधील विजयानंतर नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष

बिहार चुनाव तो झाकी है, BMC बाकी है ! बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

Bihar Election: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची अलीनगरमधून दमदार आघाडी|VIDEO

Pune Accident : आईच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला गेली, वाटेतच काळाने घातला घाला; पुण्यातील अपघातात ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

5 & 7 Star Hotels : 5 आणि 7 स्टार हॅाटेलसध्ये असतो हा फरक, ९९% लोकांना अजूनही नाही माहिती

SCROLL FOR NEXT