Chandrayaan 3: चांद्रयान-3 मोहिमेची तारीख ठरली! या दिवशी अवकाशात झेपावणार, भारतासाठी अभिमानाचा क्षण

Chandrayaan-3 To Be Launched On This Day: भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटले आहे.
Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Chandrayaan-3 To Be Launched On This DaySAAM TV
Published On

Chandrayaan-3 Mission Date Set: भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 या मोहिमेच्या प्रक्षेपणाबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्रोने चांद्रयान-३ या मोहिमेच्या प्रक्षेपण तारख जाहीर केली आहे. 13 जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार असल्याची माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. चांद्रयान-३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल असे इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटले आहे.

चांद्रयान-2 नंतर हे मिशन चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी पाठवले जात आहे. चांद्रयान-2 मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाली होती. त्याचा लँडर पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकला आणि त्यानंतर त्याचा पृथ्वीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. तीच अपूर्ण मोहीम पूर्ण करण्यासाठी चांद्रयान-३ पाठवले जात आहे. यामध्ये लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि पृष्ठभागावर फिरेल.

Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Maharashtra Rain Alert: राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे; 'आषाढी'च्या दिवशी या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

लँडरमध्ये चार, रोव्हरमध्ये दोन पेलोड

चांद्रयान-३ च्या लँडरमध्ये चार पेलोड आहेत, तर सहा चाकी रोव्हरमध्ये दोन पेलोड आहेत. याव्यतिरिक्त प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री पेलोड देखील आहे, जे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करेल. लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलवरील पेलोड अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, शास्त्रज्ञांना पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्राबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करेल.

लँडर, रोव्हर यांची जुनी नावे असतील

भारतीय अंतराळ संशोधन परिषदेने चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरला तीच नावं देण्याचा निर्णय घेतला आहे जी चांद्रयान-2 च्या लँडर आणि रोव्हरची होती. याचा अर्थ लँडरचे नाव विक्रम असेल. हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि रोव्हरचे नाव प्रज्ञान असेल. (Marathi Tajya Batmya)

Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Bus Driver Heart Attack Video: धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक! दैव बलवत्तर म्हणून वाचले प्रवाशांचे प्राण

चांद्रयान-३ मोहीम नेमकी काय आहे?

चांद्रयान-3 अंतराळयान LVM3 द्वारे (लाँच व्हेईकल मार्क-III) सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-3 हा चांद्रयान-2 चा पुढील प्रोजेक्ट आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि परिक्षण करेल. त्यात लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. (Latest Political News)

चांद्रयान -3 हे चांद्रयान-2 सारखेच दिसेल. यात ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असतील. चांद्रयान-३ चा फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. तसेच अल्गोरिदम सुधारण्यात आले आहेत. चांद्रयान-2 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलेल्या कारणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com