Akshay Gavate Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News : 'अग्निवीर' अक्षय गवते यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Akshay Gavate : उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

प्रविण वाकचौरे

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सिचायिनमध्ये वीरमरण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अक्षय गवते हे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावातील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. (Latest News)

सियाचीनमधील याचीन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्यावर होते. जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार, अक्षय यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांना एक लहान बहिण असून त्यांचे आई-वडील शेती करतात. प्रचंड मेहनत आणि जिद्दीने अक्षय अग्निवीर म्हणून सैन्यदलात भरती झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

भाजपचं सरकार संकटात; काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव

ऑपरेशन लोटसचा काँग्रेसला धक्का, प्रज्ञा सातवांचा गॉडफादर कोण?

SCROLL FOR NEXT