Eknath Shinde and ambadas danve  saam tv
महाराष्ट्र

Shivsena| मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेताही शिवसेनेचाच; एकीकडे एकनाथ शिंदे दुसरीकडे दानवे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ९ मंत्राने शपथ घेतली, तेही आम्ही शिवसैनिक म्हणूनच. त्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष निवड झाल्यानंतर औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आला,

डॉ. माधव सावरगावे

Shivsena Crisis News : कन्फ्युजनही कन्फ्युजन है... अशी राज्याच्या राजकारणाची सध्याची स्थिती आहे. कारण मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता हे दोघेही शिवसेनेचे आहेत. आता शिवसेना कोणाची याबद्दल त्यांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे राज्यातली जनता मात्र गोंधळलेल्या अवस्थतेच आहे. शिवसेना भाजपचा सरकार म्हणून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ९ मंत्राने शपथ घेतली, तेही आम्ही शिवसैनिक म्हणूनच. त्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष निवड झाल्यानंतर औरंगाबादमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आला, तिथेही शिवसेनेचे (Shivsena) भगवे फडकत होते. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

गेली अडीच वर्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार असताना त्याला शिवसेनेच्याच आमदारांनी उलथून टाकले. सरकार पडलं, पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून त्या आमदारांना बंडखोर ठरवलं गेलं. मात्र, त्या बंडखोरांनी आम्ही बंडखोर नसून शिवसेनेचे आमदार आहोत, असे ठासून सांगितले. त्यात राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे.

दोन्ही गटाच्या नेत्यांमुळे राज्यातल्या जनतेला सत्ता कोणाची असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना भाजपची सत्ता असली की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा उल्लेख हातावर असायचा. पण आता चक्क शिवसेना-भाजपच्या सत्तेमध्ये शिवसेनाच विरोधी पक्ष आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचा, विरोधी पक्षनेताही शिवसेनेचा. अंबादास दानवेंच्या नियुक्तीनंतर आता कायदेशीर तांत्रिक पेचही निर्माण झाला आहे. शिवसेना नेमकी कुणाची? गुंता कसा सोडवणार? न्यायालयीन लढाईवर काय परिणाम होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT