Rohit Pawar’s viral video sparks political storm — Devendra Fadnavis allegedly linked to Nilesh Ghaywal. Saam Tv
महाराष्ट्र

Nilesh Ghaywal Case: देवेंद्र फडणवीसांचा सचिन घायवळसोबतचा व्हिडिओ; रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ

Devendra Fadnavis Video With Ghaywal : आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या एका नवीन व्हिडिओमुळे वाद निर्माण झालाय. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या नावाचा उल्लेख केला. दरम्यान घायवळ यांच्या गुन्हेगारी संबंधांवर आणि राजकीय संरक्षणावर सरकारवर टीका होत असताना नवा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सचिन घायवळसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • निलेश घायवळ प्रकरणावरून सरकार आणि भाजपवर तीव्र टीका होतेय.

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली.

गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गुन्हेगारीला काही लोकांकडून राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढण्याचा निर्णय घेतलाय, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश घायवळ प्रकरणावरून दिला होता. पण आता मात्र स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांचे नाव घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

निलेश घायवळ प्रकरणावरून सरकारची कोंडी झाली आहे. विरोधांकडून टीका केली जातेय. कोथरुडमधील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेलाय. दरम्यान घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केल्यापासून नवनवीन खुलासे उघडकीस येत आहे. दररोज नवनवीन राजकीय नेत्यांसोबत घायवळ संपर्कात होता. शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप नेते राम शिंदे यांचे निलेश घायवळसोबत संबंध आहेत.

त्यांच्या सांगण्यावरून त्याच्या भावाला शस्त्रपरवाना मिळवला असेल, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. इतकेच नाहीतर राम शिंदेंच्या प्रचार सभेत निलेश घायवळ प्रचारासाठी आला होता असा दावाही रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. रोहित पवारांवर टीका करण्यात आली. त्यानंतर आता रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि निलेश घायवळ यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ एका प्रचार सभेतील आहे. ही प्रचारसभा कर्जत जामखेड मतदारसंघातील होती.

या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावर सचिन घायवळ होता. विशेष म्हणजे ही सभा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली होती. फडणवीस यांनी त्या सभेत सचिन घायवळ याचं नाव घेतलं होतं. तसेच सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेतही देवेंद्र फडणवीस यांनी त्यंचे नाव घेतलं होतं, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.

दरम्यान घायवळ प्रकरणात अनेक भाजप नेत्यांची नावे समोर येत आहेत. आधी चंद्रकांत पाटील, नंतर राम शिंदे आणि आता खुद्द देवेंद्र फडणवीस याचे नेवा जोडले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT