Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती,पण हिंदीचाही अभिमान: मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis statement On Hindi Language: रवींद्र चव्हाण यांची आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

Bharat Jadhav

महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे. मराठी शिकावीच लागणार आहे. त्याचबरोबर आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. देशातील प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषाला विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर मराठीच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे टीका केली. भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरा बदलून दाखवला. पण तुम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम केल्याची टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता केलीय.

12 वी पर्यंत मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी सक्तीची करा हे उद्धव ठाकरेंच्या समितीनं सांगितलं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. उद्धव ठाकरे केवळ मराठीच्या नावावर राजकारण करताहेत. पण मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. बीबीडी चाळेत आम्ही त्याला घर दिले. धारावीमधील गरिब माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो. आपण जे केले त्याच्याविरुद्ध बोलायच आणि जिंकलो असं सांगायचं असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला.

कोणाची युती झाली पाहिजे, कोणाची अयुती झाली पाहिजे, याच्यासाठी राजकारण करणार आम्ही नाहीत. महाराष्ट्राच्या हितासाठी राजकारण करणारे आहोत, असे फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत म्हणाले. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचंय. राज्यातील कानाकोपऱ्यामधील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. युवांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, असं म्हणत १६ लाख कोटींचे करार करुन राज्याला प्रथम क्रमांकावर आणल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT