Mahayuti tensions rise as CM Fadnavis responds to growing rift with Deputy CM Shinde. Saam Tv
महाराष्ट्र

मंत्रिमंडळावर बहिष्कार, दिल्लीत तक्रार; उपमुख्यमंत्र्यांच्या अबोलावर CM फडणवीसांचं मोठं विधान

Mahayuti Tension: मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कार त्यानंतर दिल्लीत शिंदेंनी तक्रार केल्यानं महायुतीत तणाव वाढलाय. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील दरी वाढलीय.

Bharat Jadhav

  • शिवसेनेच्या बहिष्कारानंतर महायुतीतील तणाव आणखी तीव्र झालायं

  • फोडाफोडीच्या तक्रारी थेट अमित शाहांपर्यंत पोहोचल्या आहेत.

  • आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलंय.

शेतकरी, सामन्य वर्गाचं हे महायुती सरकार आहे. महायुती ना तुटणारी युती आहे, आशा घोषणा देणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे आणि कुरघोडीचे राजकारण तापलंय. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांतील संबंध कमालीचे बिघडल्याचं दिसत आहे.

इतकेच नाही तर नेत्यांची फोडाफाडीमुळे नाराज शिवसेनेनं मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला, त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बिनसलं. इतकेच नाही तर फोडाफोडीची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झालाय.

घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. तशी कुठलीही परिस्थिती नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मित्रपक्षांमध्येच सुरू असलेल्या नेत्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाची तक्रार केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा आलाय असं म्हटलं जात होतं. बिहारच्या शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यानही या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून त्यांच्यातील नाराजी उघडपणे दिसून आली होती.

नेत्यांनी एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळील एका कार्यक्रमातही शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केलं आणि लगेच दोघेही बाजूला झाले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये.

हा वेड्यांचा बाजार सुरू आहे आणि यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत. त्यामुळे परवा जेव्हा मी आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी हुतात्मा स्मारकावर गेलो तेव्हा आल्यावर आणि जाताना आम्ही भेटलो. . ते कुठे जातायत हे त्यांनी सांगितले आणि मी कुठे जातोय हे त्यांना सांगितले. त्यातून काही गोष्टी क्लिक करुन बोललो नाही असं दाखवलं गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT