Maharashtra Cabinet Meeting Decisions Saam Tv News
महाराष्ट्र

Cabinet Decision : कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ४ मोठे निर्णय

CM Devendra Fadanvis Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, धारावी पुनर्विकासासाठी जागा, टोल सवलतीसाठी भरपाई आणि रुग्णालयांसाठी जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Government Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करून त्यासाठी पदनिर्मिती, जागा आणि खर्चास मान्यता देण्यात आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या करारातील अटींमध्ये सुधारणांना मान्यता मिळाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास मुंबई प्रवेशद्वारावरील पथकर सवलतीच्या भरपाईस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकी घेतलेले चार निर्णय कोणते ?

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. ( महसूल विभाग)

कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आली. विरोध न जुमानता राज्य सरकारनं जागा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता

(महसूल विभाग)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई.

(सार्वजनिक बांधकाम विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT