nashik-schoolgirl-heart-attack-death 
महाराष्ट्र

नाशिकमध्ये हळहळ! शाळेच्या गेटवरच दुर्दैवी घटना, सहावीतील मुलीचा हॉर्ट अटॅकने मृत्यू

नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेच्या गेटवरच सहाव्या मुलीचा हाॅर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

  • नाशिकमधील सहावीतील श्रेया कापडी हिला शाळेच्या गेटवरच चक्कर

  • शिक्षकांनी तात्काळ रुग्णालयात नेले, पण मृत घोषित

  • हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, आधीपासून त्रास होता

  • शहरात आणि शाळेत हळहळ, बालवयात वाढते हॉर्ट अटॅकचे प्रमाण

Nashik school student collapses due to heart issue : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या सहावीतील मुलाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.य आज सकाळी शाळेच्या गेटवरच मुलीला चक्कर आल्यामुळे खाली कोसळली. शिक्षक अन् शिपायांनी तात्काळ तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तिचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या श्रेया किरण कापडी या सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना अचानक चक्कर आल्याने ती कोसळली. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता.

श्रेया हिच्या जाण्याने कापडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये आणि शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रेयाच्या अकाली जाण्याने नाशिककर हळहळले असून कापडी कुटुंबाच्या दुखात सहभागी झाले आहेत. त्यांना धीर दिला जातोय. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये हॉर्ट अटॅकचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना बसल्या जागी अथवा काम करताना, व्यायाम करताना हॉर्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत.

लहान वयात हृदयविकार का वाढतोय?

लहान वयात हृदयविकाराचा झटका येणे ही गंभीर बाब आहे, आणि यामागे जन्मजात दोष, आनुवंशिक आजार, जीवनशैली, किंवा वैद्यकीय निदानाचा अभाव हे कारण असू शकते. भारतीय लोकांमध्ये हृदयविकाराचा आनुवंशिक धोका जास्त आहे, आणि याचे प्रमाण लहान मुलांमध्येही दिसून येते. लहान मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा गंभीरपणे घेतली जात नाहीत, ज्यामुळे अचानक मृत्यू होण्याचा धोका वाढतो. जीवनशैलीतील बदल हे याचं प्रमुख कारण असू शकते. पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव, जंक फूडचे वाढते सेवन, आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

Ajit Pawar: जादूची कांडी नाही माझ्याकडे – विकासकामांवरील तक्रारींवर अजित पवारांचा संताप|VIDEO

Plane Crash : भयंकर! विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं; 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT