महाराष्ट्र

Class 12 Maths Exam: 12वीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार नाही, राज्य शिक्षण मंडळाने केले स्पष्ट

Class 12 Maths Exam: गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येत होती.

सुरज सावंत

Class 12 Maths Exam: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी 3 मार्च रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून 12 वीच्या गणिताचा पेपर व्हायरल झाला होता. गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येत होती. यावर राज्य शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे की, "गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही". (Latest Marathi News)

दरम्यान या प्रश्नपत्रिकेतील दोन पानं सकाळी 10.30 नंतर प्रसिद्ध झाली असून मंडळ सूचनेनुसार सकाळच्या सत्रात 10.30 वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात 2.30 वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (HSC Exam News)

तसेच संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असे अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Name History: इंदुरीकर महाराजांना 'इंदुरीकर' हे नाव कसं पडलं?

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका; ठाकरे बंधूंना धक्का, बड्या नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

तानाजी सावंत यांच्या भावाचा भाजप प्रवेश रखडला; कौटुंबिक की राजकीय मतभेद? नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT