Nashik Ambad Police Station Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime News: उंटवाडीत 2 गट भिडले, एकावर तलवारीने वार; धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेरात कैद

Nashik Marathi News: नाशिकमध्ये पोलिसांचा दरारा संपला?

अभिजीत सोनावणे

Nashik News Today: अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत उंटवाडी येथे भरदिवसा धारधार शस्त्राने एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व घटनांमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला. (Latest Marathi News)

रविवारी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास २ मोठ्या कारमधून आलेल्या युवकांमध्ये आपापसात हाणामारी झाली. यात काहींकडे तलवार आणि कोयत्यासारखे धारदार हत्यारे होती. काहींनी हत्यारे उगारत एका युवकावर हल्ला केला. सोबतच्या युवकांनी तलवारीने जखमी झालेल्या युवकाला तातडीने रूग्णालयात नेले.

हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आला असून यात तलवार आणि कोयते तसच हाणामारीचे गंभीर चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अंबड पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीत सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

त्यामुळे नाशिकमध्ये (Nashik) पोलीसांचा दरारा संपला की काय? असा प्रश्न पडला आहे. टवाळखोर युवकांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहनांच्या काचा फोडणे, चोरी, लुटमार आदी घटना या भागात वाढल्या आहेत.

दरम्यान, याआधी शनिवारी (15 जुलै) देखील नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महाकाली चौकातील ही घटना घडली आहे.

महाकाली चौकात घडलेल्या या हणामारीच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. टोळक्याकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. या हाणामारीच्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा राडा नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Nashik News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT