Sangli News  Saam TV
महाराष्ट्र

Sangli NCP Dispute News : सांगलीत राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार राडा; महापालिकेत नगरसेवक एकमेकांशी भिडले

Sangli NCP News : सांगलीत महापालिकेत सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.

विजय पाटील

Sangli News : महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पक्षात तयार झाले. त्यानंतर एकत्र काम करणारे नेते आता एकामेकांविरोधात दिसत आहे. सांगलीत महापालिकेत सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. अजित पवार गटाचे नगरसेवक आणि शरद पवार गटाचे नगरसेवक एकमेकांशी भिडले आहेत. नगरसेवक योगेंद्र थोरात आणि मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे यांच्यात वादावादी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 20 मधील विकास कामाच्या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव अजितदादा गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी घेतल्याने जयंत पाटील गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. (Latest News Update)

यानंतर अजित पवार गटाचे नगरसेवक आणि शरद पवार गटाचे नगरसेवक एकमेकांशी भिडले. यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे यांच्यात जोरदार वादावादी झाली. (Maharashtra News)

अखेर वाद वाढल्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दोन नगरसेवकाचे निलंबन करत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले .यामध्ये महापौरांनी अजित पवार गटाचे योगेंद्र थोरात आणि जयंत पाटील गटाच्या संगीता हारगे यांचे निलंबन केले आणि त्यांनतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT