CJP Jantar Mantar 2.0 protest on October 10 saam tv
महाराष्ट्र

अभिजीत दिपके दिल्लीत धडकणार, 10 मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा 'प्लॅन बी'

Abhijeet Dipke Announces ‘Chalo Delhi’ Protest: मुंबईनंतर आता अभिजीत दिपकेंनी जंतरमंतर -२ ची तयारी सुरू केलीय. त्यासाठी सीजेपीनं काय रणनीती आखलीय? दिल्ली पोलिसांनी रोखलं तर सीजेपी काय करणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट......

Suprim Maskar

CJPच्या मुंबईतील आंदोलनात अभिजित दिपकेंनी चलो दिल्लीचा नारा दिलाय...एकीकडे दिल्लीत AISAच्या नेहा बोरांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी ज्ञानेश कुमारांविरोधात जंतर-मंतरवर एल्गार पुकारलेला असतानाच दुसरीकडे मुंबईतील आंदोलनालाही तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला... मुंबईतलं आंदोलन शांततेत पार पडलेलं असताना दिल्लीतल्या जंतर मंतरवर मात्र पोलिसांनी आंदोलकांची सलग दोन दिवस धरपकड केली. त्यामुळे आंदोलनात मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळेच आता सीजेपीनं आपला मोर्चा आता दिल्लीकडे वळवल्याची घोषणा केलीय.

मुंबईतल्या आंदोलनानंतर दिपकेंनी X पोस्ट करत जंतर- मंतर 2.0 चा अल्टिमेटम जाहीर केलाय. जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर 10 ऑक्टोबरला देशभरातील झुरळ दिल्लीकडे कूच करतील आणि जंतर-मंतरवर आंदोलन करतील. त्यामुळे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. ज्या नागरिकांना निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत, त्यांनी या आंदोलनात सहभागी झालेच पाहिजे.

खरतर मुंबईतील आंदोलनानंतर CJPचा देशभरातील प्रमुख शहरांमध्ये फिरून जनमत तयार करण्याच्या तयारीत होती..मात्र CJPच्या नॅशनल वर्किग कमिटीच्या बैठकीत धोरणात अचानक बदल करण्यात आलाय... इतर शहरातील दौरे रद्द करून CJPनं 10 ऑक्टोबरची डेडलाईन दिलीय...त्यामुळे 10 ऑक्टोबरपर्यंत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास देशभरातील CJPचे कार्यकर्ते आणि नागरिक दिल्लीत धडकतील...मात्र दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलन रोखल्यास CJPनं काय प्लॅन बी आखलाय...पाहूयात..

CJPचा प्लॅन बी ठरला?

नीट पेपरफुटीप्रकरणी सुरु असलेल्या जंतर-मंतरवरील आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता

CJPचा आधीच्या आंदोलनातील अनुभव पाहता पोलीस आंदोलकांना जंतर-मंतरवर जाण्यापासून रोखण्याची शक्यता आहे...

आंदोलकांना रोखल्यास जिथे रोखलं जाईल, तिथेच दुसरं जंतर-मंतर तयार करण्याची रणनीती CJPनं आखलीय.

जिथे पोलीस रोखतील तिथेच बसून पुढील आंदोलन सुरू करण्याचा प्लॅन CJPनं आखलाय.

जुलै महिन्यात नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिपकेंनी दिल्लीत आंदोलन छेडलं होतं...त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर देशभरात वातावरण तापल्यानं अखेर धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता... त्यामुळे दिपकेंनी जंतर-मंतर 2.0 ची घोषणा करताच दिल्ली पोलिस अलर्टवर आलेत... नेहा बोरांच्या आंदोलनाला रोखल्यानंतर हे स्पष्ट झालयं....त्यामुळे आता 10 ऑक्टोबर आधी ज्ञानेश कुमार राजीनामा देणार की दिल्लीत पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलनाला भ़डका उडणार? याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या, एका प्रामाणिक व पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करा- राहुल गांधींची मागणी

14 पोलीस आयुक्तांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

AIच्या युगात मराठीची नवी ओळख; फडणवीसांनी सांगितला भाषेच्या विस्ताराचा रोडमॅप

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

SCROLL FOR NEXT