Mumbai Goa Highway Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway : कोकणातील नागरिकांचा परतीचा प्रवासही खडतर; वाहतूक कोंडीस सुरुवात

Traffic Jam : माणगावमध्ये वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News :

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या नागरिकांचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एकाच वेळी अनेक नागरिक मुंबईच्या दिशेने निघाल्याने महामार्गावर वाहनांची संख्येत वाढ झाली आहे.

१६ सप्टेंबर रोजीपासून गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने टप्प्याटप्पाने कोकणात गेले आहे. काल (२३ सप्टेंबर) गौरी गणपतींच विसर्जन झाल्यानंतर आज परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

माणगावमध्ये वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र माणगाव वगळता अद्याप महामार्गावर कुठेही वाहतुक कोंडी झाल्याचं दिसून येत नाही.

महामार्गावर दुपारनंतर थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी महामार्गावर तैनात झाले आहेत. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखरुप होईल, यासाठी नियोजन केले जात आहे. (Latest Marathi News)

रत्नागिरीत परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे प्रवास संत गतीने सुरु आहे. नागरिकांना काही ठिकाणी सीएनजीचा तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावी जाताना नागरिकांचा जो मनस्ताप सहन करावा लागला, तो अनुभव परतीच्या प्रवासात येऊ नये ही अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT