Contaminated Water
Contaminated Water दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातूर शहरातील नागरिकांना पिवळ्या पाण्याची शिक्षा!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर: लातूर आणि पाणीटंचाई हे समीकरण आहे. लातूरची पाणी टंचाई आणि त्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी येण्याची वेळ आली. मात्र, यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असून देखील लातूर शहरातील (Latur) नागरिकांना पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (Latur News)

खरेतर, पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. असे असले तरी लातूर महानगरपालिकेला याचा विसर पडल्याचं दिसतंय. कारण मागील महिनाभरापासून शहरात जो पाणीपुरवठा केला जातो, हे पाणी अस्वच्छ स्वरूपाचे येतंय या पाण्याचा रंग पिवळा आहे. जे पाणी नगरपालिकेकडून नळाद्वारे सोडले जाते हे पिण्यायोग्य नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे, लातूर महानगर पालिकेकडून पाच लाख नागरिकांची जीवाशी खेळ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आम्हाला पिवळ्या पाण्याची शिक्षा मिळत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

मागील काही वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आणि रेल्वेने पाणी आणण्याची वेळ ओढावली. पाच लाख लोकसंख्या असलेले शहरात महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. मात्र, या सर्वांच्या जीवाशी खेळ महानगरपालिकेकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मागील महिनाभरापासून प्रत्येक दिवशी या ठिकाणी पिवळा पाणी येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे अनेकांना आजारही जडत आहेत. ज्या लातूर शहरात पिवळ्या पाण्याची शिक्षा सुरू आहे या जिल्ह्यातीलच पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे देखील आहेत. मात्र पाणीपुरवठा राज्यमंत्री यांचं या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचं या सर्व प्रकारानंतर पाहायला मिळत आहे.

तर, महिनाभरापासून लातूर शहरांमध्ये पिवळे पाणी येत असल्यामुळे भाजप आक्रमक झाली आणि माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात थेट महानगरपालिकेवर ती मोर्चा काढला आणि पिवळ्या पाण्यावरून राजकारण सुरू झालं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका नागरिकांना शुद्ध पाणी ही पुरवत नसल्यामुळे लोकांना पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामुळे पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

हे देखील पाहा-

यावर भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावर मनपा योग्य ती कार्यवाही करत असून विरोधी पक्षांनी अश्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवावं महानगरपालिकेतील महत्त्वाचे तिन्ही पदे भाजपाकडे आहेत. पण अडचणीच्या काळात केवळ राजकारण केले जात आहे याला लातूरकर माफ करणार नाही असं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

लातूरच्या नागरीकांचा आरोग्य धोक्यात आलय पालकमंत्री अमित देशमुख आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यात लक्ष घालून नागरिकांना पिवळ्या पाण्यापासून सुटका करणं गरजेच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

Today's Marathi News Live : यवतमाळला चार दिवसांचा येलो अलर्ट

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT