sangli, shirala, landslide, rain saam tv
महाराष्ट्र

Sangli : भूस्खलनचा धाेका; वाडीतील ८० कुटुंबातील २५० नागरिकांना केले स्थलांतरीत

डफळेवाडी येथे सध्या जास्त धोका नसल्याने त्या लोकांचे अद्याप स्थलांतर करण्यात आलेले नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या (sangli) शिराळा (shirala) तालुक्यातील मिरूखेवाडी येथे भूस्खलनचा (landslide) संभाव्य धोका असलेल्या वाडीतील वस्तीवरील लोकांना खबरदारीचा उपाय म्हणुन वाहनातून स्थलांतरीत केले जात आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा (Rain) जोर वाढल्याने शिराळा पश्चिम भागातील भूस्खलनचा धोका निर्माण झालेल्या पाच वाडीतील वस्ती पैकी चार ठिकाणच्या ८० कुटुंबातील २५० नागरिकांचे खबरदारीचा उपाय म्हणुन तातडीने स्थलांतर करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे (tashildar ganesh shinde) यांनी दिली. (shirala latest marathi news)

भाष्टेवस्ती, कोकणेवाडी, धामणकरवस्ती , मिरूखेवाडी, डफळेवाडी या पाच वाड्यावस्त्यावरील डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उन्माळे लागले आहेत. त्यामुळे भूस्खलनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती ,मिरूखेवाडी, येथील सध्या ८० कुटुंबातील २५० लोकांना स्थलांतर केले आहे.

स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना चहा, नाष्टा,दोन वेळचे जेवण याची सोय करण्यात आली आहे. यासाठी ग्रामसेवक, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य योग्य ते नियोजन करत आहेत. स्थलांतरीत लोकांची आरोग्य विभागा मार्फत तपासणी करण्यात आली आहे.

शेतीची कामे व जनावरांची देखभाल करण्यासाठी सकाळी लोक गावाकडे जाऊन सायंकाळी परत मुक्कामी येणार आहेत. वृद्ध व लहान मुळे मुक्कामीच राहणार आहेत. डफळेवाडी येथे सध्या जास्त धोका नसल्याने त्या लोकांचे अद्याप स्थलांतर करण्यात आलेले नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Officer Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

Maharashtra Government: महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी; 47 अधिकाऱ्यांना बढत्या

यांना मिरच्या का झोंबतात? नळबाजार, भिवंडीत जाऊन विचारा!; राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा काढताच नितेश राणेंचं टीकास्त्र

Maharashtra Live News Update: वाशिम अपघात; दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एकजण ठार

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

SCROLL FOR NEXT