Tarapur Atomic Power Station Saam TV
महाराष्ट्र

Palghar: तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेवर असलेला जवान फरार; रायफलसह जिवंत काडतुसंही नेल्याने खळबळ

Tarapur Atomic Power Station News: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान रायफल आणि 30 जिवंत काडतुसांसह काल पासून बेपत्ता असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर: देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्प (Tarapur Atomic Power Station) आणि भाभा अणुशक्ती केंद्रात सुरक्षारक्षक असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) जवान रायफल आणि 30 जिवंत काडतुसांसह काल पासून बेपत्ता असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनोज यादव असं या सीआयएसएफच्या जवानाचं नाव असून तो कालपासून फरार (fugitive) असल्याची माहिती समोर आली आहे. (Palgahar Latest News)

हे देखील पाहा -

मनोज यादव हा सुरक्षारक्षक (Soldier) काल, शुक्रवारी सकाळी कामावर हजर झाला. मात्र त्यानंतर तो अचानक ऑन ड्युटी असताना फरार झाला. या जवानाजवळ एलएमजी रायफल आणि तीस जिवंत काडतुसं असल्याचं उघड झालं असून त्याचा शोध घेतला जातोय. काल दिवसभर शस्त्रास्त्रांसह अचानक गायब असलेला सीआयएसएफचा जवान पुन्हा कामावर रुजू होईल असं स्थानिक सीआयएसएफच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना वाटत होतं. मात्र तो आजही न परतल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT