चित्रा वाघ Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या वाघांचे शिवसेनेच्या वाघांना चॅलेंज, ही अटक करून दाखवा

सचिन आगरवाल

अहमदनगर ः भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेल्या अटकेचाही त्यांनी निषेध केला. कायदे फक्त भारतीय जनता पक्षासाठीच आहेत का, असा सवालही त्यांनी विचारला. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.

आज पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची त्यांनी भेट घेतली. चार दिवसांपूर्वी सोशल मीडियात तहसीलदार देवरे यांची पोस्ट व्हायरल झाली होती. मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचेही त्यांनी त्यात क्लिपमध्ये म्हटले होते. या पार्श्वभूमीवर वाघ यांनी देवरे यांची भेट घेत समजूत काढली. तसेच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. Chitra Wagh criticizes Thackeray government

अटक करण्याची, गुन्हे दाखल करण्याची तत्परता ही फक्त भाजपच्या नेत्यांसाठी आहे का. हीच तत्परता पुणे, औरंगाबाद आणि पारनेरमध्ये का नाही दाखवली, ते राष्ट्रवादीचे होते म्हणून. असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

कायदे आणि नियम फक्त भाजपसाठी आहेत, सत्ताधाऱ्यांना ते लागू होत नाही का? यामुळे सामाजिक समतोल बिघडत नाही का? हीच का शिवशाही असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री यांना विचारला आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू असतानाच प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचे केलेलं कौतुकदेखील व्हायरल झालं होतं.

इंदोरीकरमहाराजांनाही इशारा

महिलेला होणारा छळ आणि त्रासाला तुम्ही कुत्र्याची उपमा देतात, हे फक्त हत्तीने बिदागी दिली म्हणून का? बिदागी घ्या आणि दुसऱ्या गावात जाऊन कार्यक्रम करा पण महिलेच्या वेदनेची थट्टा करू नका. वेदना झालेल्या महिलेला कुत्री म्हणून तुम्ही सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणून बळ द्यायचे काम करत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी इंदोरीकर महाराजांना यांना विचारला आहे. इंदोरीकर महाराजांनी बोलताना तारतम्य बाळगावे, तुम्हाला महिलांची ताकद माहीत नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.Chitra Wagh criticizes Thackeray government

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT