तर गृहराज्यमंत्र्यांच्या सुरक्षेची केंद्राकडे मागणी करावी लागेल; चित्र वाघ यांचा शंभूराज देसाईंना टोला  SaamTv
महाराष्ट्र

तर गृहराज्यमंत्र्यांच्या सुरक्षेची केंद्राकडे मागणी करावी लागेल; चित्रा वाघ यांचा देसाईंना टोला

मागील काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओंकार कदम

सातारा : सातारा (Satara) येथे आयोजित पत्रकार परिषदेत, आज भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या वेळी बोलत असताना त्या म्हणाल्या, राज्यातील महिला आणि मुली सुरक्षित नसून मंत्रीच (Minister) महिलांवर बलात्कार (Rape) करत असल्याच्या गंभीर घटना घडत आहेत.

यावेळी महाराष्ट्रातील अशा अनेक घटना सांगत त्यांनी काही अधिकारी देखील महिलांना शरीर सुखाची मागणी करत आहेत आणि अशा अधिकाऱ्यांना पोसण्याचे काम मंत्री करत आहेत अशी टीका केली.Chitra Wagh criticizes Shambhuraj Desai

हे देखील पहा -

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी आत्तापर्यंत महिलांवर होणारे अत्याचार याबाबतची किती प्रकरणे हाताळली याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवाल करत जर का राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचा अज्ञातांकडून पाठलाग होत असेल तर आम्हाला केंद्राकडे त्यांच्या सुरक्षिततेची मागणी करावी लागेल असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

शंभूराज देसाईंवर वाघ यांनी केलेल्या टीकेची पार्श्वभूमी :

मागील काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याबद्दल माहिती दिली होती. १३ जून रोजी सायंकाळच्या वेळी देसाई हे फेरफटका मारण्यासाठी गेले असता मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्ती शंभूराज देसाई यांचे चित्रीकरण करत असल्याची व त्या व्यक्तींची हालचाल संशयास्पद वाटत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती.

फेरफटका मारून घराकडे जाताना देखील हाच प्रकार त्यांना जाणवला होता. त्यावेळी देसाई यांच्या सोबत त्यांचे दोन सुरक्षा रक्षक देखील उपस्थित होते. याबाबत सातारा पोलिसांना तपासाचे आदेश देखील देण्यात आले होते. याच घटनेच्या अंनुषंगाने चित्रा वाघ यांनी शंभूराज देसाईंना टोला लगावला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT